…तर शेतकऱ्यांसारखं विद्यार्थी आत्महत्यांचं सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही!
पुणे विद्यापीठात गोंधळ आहे, चुकीच्या निर्णयांचे डोंगर आहेत. पैशाचा, वेळेचा अपव्यय आहे आणि अनेकांच्या आयुष्याशी सुरू असलेला खेळ आहे, हे मान्य करावंच लागेल. परिणामी पुणे विद्यापीठाचा दर्जा ढासळला आहे. ढिसाळ कारभार, शिक्षणाचा आणि शिक्षकांचा ढासळलेला दर्जा, कॉपी आणि परीक्षेतील गोंधळामुळे निर्माण झालेली बजबजपुरी हेच इथलं विद्यमान वास्तव झालं आहे.......